vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

खेळाडूंनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन 

खेळाडूंनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

          जालना, प्रतिनिधी(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तरी शासनाने नुकत्याच दि. 29 डिसेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, 2023 ची नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारासाठी दि. 8 ते 22 जानेवारी, 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंकमध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. 8 जानेवारी ते 22 जानेवारी, 2024 पर्यत या कालावधीत दि. 22 जानेवारी, 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय यशाकडे टप्पा*कॅरम व कुस्ती स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे वर्चस्व…

vishwatmaklokswamivarta

जितेंद्र अग्रवाल यांनी जालन्याचा डंका अटकेपार पोहोचवला!नामांकित व खडतर अशी 87 की.मी.ची स्पर्धा जितेंद्र अग्रवाल यांनी केवळ 11 तास 42 मिनिटात पूर्ण..

खेलोइंडिया युवा स्पर्धेतील कामगिरीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रात एक पाऊल पुढे पडले आहे. भविष्यातही महाराष्ट्राचे खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करतील आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला टक्का वाढवतील. उत्तमोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्र सरकार खेळाडूंच्या सतत पाठिशी उभे राहील- क्रीडामंत्री गिरीष महाजन

vishwatmaklokswamivarta

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानच्या विजयानंतर स्टेडियम बनले रणांगण, संतप्त अफगाणिस्तानच्या चाहत्यांकडून पाकच्या चाहत्यांना मारहाण

vishwatmaklokswamivarta