vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*

बुलढाणा, प्रतिनिधी-  जिल्हा क्रीडा संकुल व जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यलयात संपन्न झाली.

या बैठकीला समितीचे सदस्य सचिव जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर, सदस्य जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, शिक्षण विभागाच्या जयमाला राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेश एकडे, पोलीस विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यापूर्वी झालेल्या कामांचा आणि जमा खर्चाचा आढावा घेतला. त्यानंतर नगरपरिषदचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर रक्कम भरणा केला असून त्यांच कार्योत्तर मंजुरी देणे, जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथील क्लब हाऊस रंगरंगोटीचा खर्च अदा करण्यास मान्यता देणे, जिजामाता स्टेडीयम येथील क्लब हाउसमधील मोकळ्या जागेवर फॅब्रीकेटींगचे काम करण्यास मान्यता देणे, जिल्हा क्रीडा संकुल येथील जिम कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यास मान्यता देणे, जिल्हा क्रीडा संकुल आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे पोलीस भरती, सैन्य भरती व इतर सराव करणाऱ्या अकॅडमी, ग्रुप यांना अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतच्या नियमावलीस मान्यता देणे, विविध कामांना मान्यता देणे, राज्य क्रीडा विकास निधीतून अर्थसहाय्य मिळण्याकरीता अनुदान मागणी प्रस्ताव सादर करणे, जिल्हा क्रीडा संकुल येथील इमारत व परिसरामध्ये आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे सीसीटिव्ही कॅमेर खरेदीला मान्यता देणे, बॅरीकेटींग तयार करणे, जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडू, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व रंगरंगोटी करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली.

सीसीटिव्ही कॅमेर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथील इमारत व परिसरामध्ये आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे सीसीटिव्ही कॅमेर खरेदीला मान्यता दिली. तसेच बॅरीकेटींग तयार करणे, जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडू, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली. तसेच अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले.

क्रीडा संकुल वापराबाबत नियमावली

जिल्हा क्रीडा संकुल आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे पोलीस भरती, सैन्य भरती व इतर सराव करणाऱ्या अकॅडमी, ग्रुप, प्रशिक्षणार्थी यांना सूचना, अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतच्या नियमावलीस जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी मान्यता दिली.

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील 2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत…

पुणे महामेट्रो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना जाहीर-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला सायंकाळी सहानंतर पुणे मेट्रोची सेवा बंद

vishwatmaklokswamivarta

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा कोयना दौलत डोंगरी महोत्सव- पालकमंत्री शंभूराज देसाई

दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन