vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जितेंद्र अग्रवाल यांनी जालन्याचा डंका अटकेपार पोहोचवला!नामांकित व खडतर अशी 87 की.मी.ची स्पर्धा जितेंद्र अग्रवाल यांनी केवळ 11 तास 42 मिनिटात पूर्ण..

जितेंद्र अग्रवाल यांनी जालन्याचा डंका अटकेपार पोहोचवला!नामांकित व खडतर अशी 87 की.मी.ची स्पर्धा जितेंद्र अग्रवाल यांनी केवळ 11 तास 42 मिनिटात पूर्ण..

 

 

जालना प्रतिनिधी

: जागतिक स्तरावरील नामांकित व खडतर असलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन ही 87 किलोमीटरची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत नुकतीच पार पडली. यात जालन्याचे जितेंद्र अग्रवाल यांनी सहभाग नोंदवला याबद्दल फॅब रनर ग्रुपने त्यांचा पांजरापोळच्या मैदानावर सत्कार केला. सत्कारला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले, ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे ईश्वराची कृपा असावी लागते आणि मित्राच्या शुभेच्छाही पाहिजेत. अतिशय खडतर अशी ही स्पर्धा त्यांनी 11 तास 42 मिनिटात पूर्ण केली व जालन्याचा डंका अटकेपार पोहोचवला. या स्पर्धेत सहभागी होणारे जालन्याचे ते पहिलेच यशस्वी धावपटू आहेत. यावेळी फॅब ग्रुपचे अशोक राठी, अर्जुन जगताप, प्रशांत भाले, डॉ. दिलीप दिवटे, संजय अंपाळकर, किसन जाधव, धनसिंह सूर्यवंशी, अ‍ॅॅड.ईश्वर बिलोरे, राम हलनोर, काशिनाथ मोरे, श्रीराम सर, दिनेश अंधेवार, अजय सिंगला, भास्कर पवार, मनोज कुमकर, धर्मेश उजवणे, राजू सैनी, डॉ. सतीश शेकडे, केशर सिंग राजपूत, कैलास जाधव, विष्णू पाटेकर, बलराज शिराळे, अनिल मालपाणी, मिलिंद खेरुडकर, संजय रुणवाल, संजय शेजुळ, हितेंद्र त्रिवेदी, नागेश मापारी, मिलिंद वासनिक, दशरथ पडूळ, विजय लोळगे, संदीप ढगे व इतर क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

स्वच्छतेसाठी इच्छूकांनी दरपत्रक सादर करावेत

सुशासन सप्ताहात ई-शिधापत्रिका, प्रमाणपत्र, दाखल्यांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

vishwatmaklokswamivarta

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन; महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमासह विविध भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अतिरिक्त कार्यभाराबाबत लवकरच निर्णय- मंत्री चंद्रकांत पाटील

फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.१५ रोजी विशेष अदालतींचे आयोजन-जिल्हाधिकारी  यांचे आदेश; दि.७ ते १५ कालबद्ध कार्यक्रम