vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

श्रीराम मंदिरातील सोहळ्याला सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांची वंदनीय उपस्थिती !रामलला पुन्हा राम मंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदीच ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था

श्रीराम मंदिरातील सोहळ्याला सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांची वंदनीय उपस्थिती !रामलला पुन्हा राम मंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदीच ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था

 

राज्य प्रतिनिधी

      अयोध्या – ‘श्रीरामजन्मभूमीसाठी ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर रामजन्मभूमी मुक्त झाली आणि आज साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य राम मंदिराची निर्मिती होऊन रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळा आम्ही आज पहात आहोत, हा सनातन हिंदु धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशभरातील सर्व संत-महंतांना मान देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रामलला पुन्हा राम मंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदी आहे’, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी या वेळी केले.

 

ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी सनातन संस्थेच्या दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकारी यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते.

आसेतुहिमालयापासून हिंदसागरापर्यंत प्रत्येकाला एकात्मतेच्या बंधनात बांधणारे श्रीराम हे एक अलौकिक राष्ट्रसूत्र आहे ! प्रत्येकाच्या मनातील श्रीरामाच्या मंदिराची उभारणी हे न केवळ अधर्मावर धर्माचा विजय; परंतु त्याचसमवेत कलियुगांतर्गत सत्ययुगाच्या नवनिर्मितीची, हिंदूंच्या अलौकिक ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’ची, म्हणजेच स्वधर्माधिष्ठित स्वराष्ट्र, सर्वशक्तीसंपन्न, सुव्यवस्थाप्रधान, सर्वसुविधांयुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत सुराज्याच्या सूर्योदयाची नांदी आहेत, असे प्रतिपादन श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या प्रसंगी केले.

 

या वेळी दोन्ही उत्तराधिकारींनी श्रीरामाच्या मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होता आले, याबद्दल श्रीरामाच्या प्रती कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाल्यावर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी तथा उत्तर प्रदेश शासनाच्या राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आले.श्री. चेतन राजहंस,प्रवक्ता, सनातन संस्था,

 

संबंधित पोस्ट

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व चालक टोळीला मालवणी पोलिसांनी अटक

vishwatmaklokswamivarta

केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हैसाळ येथे दूरदृष्य प्रणालीव्दारे स्मार्ट पीएचसीचे जिल्हास्तरीय लोकार्पण..     

vishwatmaklokswamivarta

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 साठी वेव्हएक्सने स्टार्टअप क्षेत्राकडून अर्ज मागवले

vishwatmaklokswamivarta

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

नदीपात्रातून अतिरिक्त वाळू उत्खनन प्रकरणी ५६ कोटी ६८ लाखांचा दंड;महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दोषी अधिकारी निलंबित— महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे