vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माझा कचरा माझी जबाबदारी*स्वयम अभियान आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्था यांच्या सहयोगाने सी विभागातील स्वच्छता अभियान

*माझा कचरा माझी जबाबदारी*स्वयम अभियान आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्था यांच्या सहयोगाने सी विभागातील स्वच्छता अभियान

 

मुंबई प्रतिनिधी

माझा कचरा माझी जबाबदारी*स्वयम अभियान आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्था यांच्या सहयोगाने सी महानगरपालिका यांच्या विभागातील स्वच्छता अभियान आयोजन करण्यात आले होते

स्वयम अभियान आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्था यांच्या सहयोगाने सी विभागातील स. का. पाटील उद्यानाजवळ, प्रमोद नवलकर मार्ग. या ठिकाणी दर महिन्याचा तिसऱ्या रविवारी, सकाळी नऊ ते अकरा या वेळेत, विभागातील दक्ष व जागृत नागरिक स्वयंप्रेरणेने घराघरातील सोसायटीतील जुने प्लास्टिक आणि जुन्या इलेक्ट्रिकच्या वस्तू या ठिकाणी जमा करतात.

हा उपक्रम गेली २ वर्षे सुरू आहे.

स्वयम अभियान २०१७ पासून कचरा आणि विनियोग या कामासाठी कार्यरत आहे.

स्वयंपाक घरच्या ओल्या कचऱ्यापासून बनवण्यात येणारे खत वाटप, खत करण्याचे प्रशिक्षण, त्याचप्रमाणे प्लास्टिक आणि ई कचरा जमा करणे.

याकरिता स्वयम अभियान च्या जान्हवी गुर्जर ,मनीषा पटवर्धन, पूर्वा देवधर , प्राजक्ता रानडे आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्थेच्या कल्पना शिंदे, दिलीप गाडेकर, पिंकी माने यांनी सुद्धा या उपक्रमात सहभाग दाखविला.

जमा झालेले प्लास्टिक आणि इ कचरा डब्ल्यूडब्ल्यूएफ कंपनीला सुपूर्द करण्यात येतो.

त्यातून कचरा वेचकाचे मानधन निघते.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल विभागातील लोकांनी स्वयम अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

संबंधित पोस्ट

राज्यात आलेल्या अभ्यागतांसाठी अधिकाधिक खोल्या उपलब्ध करून देण्याचे सरकारचे हॉटेल्सच्या अधिकाऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातीलअंमली पदार्थ विरोधातील कारवाई प्रभावीपणे करा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 42 कामांना प्रशासकीय मान्यता;9 बांधकामे पूर्ण

vishwatmaklokswamivarta

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते गोरेगाव आरे कॉलनी रिटर्न मेट्रो रेल्वे चा मॉर्निंग वॉकर्स ग्रुपने घेतला प्रवासाचा आनंद

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाबरोबरच प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन.