vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

तहानलेल्या यावलपिंप्री तांड्याची ‘समृध्दी’ने भागवली तहान,गावकऱ्यांनी मानले सतीश घाटगे यांचे आभार

तहानलेल्या यावलपिंप्री तांड्याची ‘समृध्दी’ने भागवली तहान,गावकऱ्यांनी मानले सतीश घाटगे यांचे आभार

प्रदेश प्रतिनिधी

घनसावंगी : पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री तांड्यावर समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी कारखान्यामार्फत मोफत टँकर सुरु करून शेकडो कुटुंबाला दिलासा दिला.पाणी टंचाईने ग्रस्त यावलपिंप्री तांड्यावर समृध्दी’चे टँकर आल्यानंतर बंजारा बांधवानी आनंद व्यक्त करत सतीश घाटगे यांचे आभार मानले.

 

घनसावंगी तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे समृध्दी कारखान्यामार्फत मोफत पाणी टँकर सेवा सुरु करून गावकऱ्यांना दिलासा देत आहे. यावल पिंप्री तांड्यावर पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने जनतेची गैरसोय होत होती. तांड्यावरील छबुराव राठोड महाराज, नाईक उध्दव राठोड, माजी सरपंच वामनराव राठोड, एकनाथ चव्हाण, भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष पवार, ग्रां.प.सदस्य निवृत्ती चव्हाण आदींनी सतीश घाटगे यांच्याकडे टँकर सुरु करण्याची विनंती केली होती. सतीश घाटगे यांनी गावकऱ्यांची तत्काळ दखल घेऊन शुक्रवारी कारखान्यामार्फत मोफत टँकर सुरु केले.तांड्यावर आलेल्या टँकरचे विजय राठोड, गणेश महाराज राठोड, निवृत्ती पवार, शेषराव राठोड, शामराव पवार, कल्याण राठोड ,रविराज राठोड, शंकर चव्हाण, संदिप राठोड, अनिल राठोड,वरुन राठोड, धर्मा राठोड, पांडुरंग चव्हाण, बाबुराव राठोड, यावल पिंप्री ग्रां. प. सदस्य गणेश उगले यांच्यासह महिला व युवकांनी स्वागत करून सतीश घाटगे यांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट

अमरावती विमानतळ आणि प्रवाशी विमानसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ केंद्रीय आणि कॅबिनेट राज्य मंत्र्यांचा दौरा

सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन उत्साहात साजरा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

समाजमाध्यमांद्वारे ग्राहकांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे- पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- महसूल विभाग शासनाचा कणा व चेहरा असल्याची भावना – महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ..