vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

कर्मचारी पोर्टलवर चुकीची माहिती अपलोड करणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

कर्मचारी पोर्टलवर चुकीची माहिती अपलोड करणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सेवा अधिग्रहित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर आपापल्या विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती सदोष अपलोड करणाऱ्या संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई करावी,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी तथा मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे सहायक नोडल अधिकारी प्रकाश देशमुख, संगणक कक्ष व कम्युनिकेशन प्लॅन कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी ए.आर. थोरात तसेच अन्य अधिकारीही उपस्थित होते.

 

लोकसभा निवडणूकीसाठी विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात येतात. या सेवा अधिग्रहित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन पोर्टलवर संबंधित विभागप्रमुखाने आपल्या अधिनस्त कर्मचारी अधिकाऱ्यांची माहिती अपलोड करावयाची असते. ही माहिती अपलोड करतांनाच त्यात दिव्यांग व्यक्ति, गरोदर, स्तनदा माता, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, गंभीर आजारी कर्मचारी इ. सदराखालील कर्मचाऱ्यांची सेवा निवडणूकीसाठी अधिग्रहित न करण्याचा पर्याय देण्याची मुभा विभागप्रमुखांनाच आहे. तसे पर्याय त्यांनी तपशिल देऊन निवडल्यास अशा कर्मचाऱ्यांचे नाव सेवा अधिग्रहण प्रक्रियेतून आपोआप वगळले जाते. तथापि, ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरतांना विभागप्रमुखांनी चुकीची व सदोष माहिती भरल्याने अशा कर्मचाऱ्यांचे सेवा अधिग्रहणाचे आदेश ऑनलाईन तयार झाले. तरी अशा सदोष व चुकीची माहिती भरणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज दिले.

संबंधित पोस्ट

पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शासकीय कर्करोग रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्रीचे उद्घाटन उपचार व दिलासादायक वागणूकीसाठी पुढाकार घ्या- पालकमंत्री शिरसाट

नवदुर्गा वृत्तमालिका भाग 7 कन्या सबलीकरणासाठी शिक्षणाच्या संधी अधिक बळकट

vishwatmaklokswamivarta

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था  यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी इंटरनॅशनल इलेक्शन विजिटर प्रोग्राम कार्यक्रम आयोजित केला

ग्रंथांच्या यादीसंदर्भात सूचना, हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवण्याचे आवाहन