vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था  यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी इंटरनॅशनल इलेक्शन विजिटर प्रोग्राम कार्यक्रम आयोजित केला

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था  यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी इंटरनॅशनल इलेक्शन विजिटर प्रोग्राम कार्यक्रम आयोजित केला.

 

राज्य प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी international Election Visitors Programme (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधी मंडळ निवडणूक प्रक्रीयेची पाहणी करण्याकरीता दिनांक ६ ते ८ मे, २०२४ या कालावधीत रायगड जिल्हा भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

सदर प्रतिनिधी मंडळामध्ये 7 सदस्य असून हे सदस्य रायगड लोकसभा मतदार संघातील विविध ठिकाणी भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची पाहणी करणार आहेत. महाराष्ट्रातील केवळ रायगड जिल्ह्यामध्ये हे मंडळ भेट देणार आहे

.विदेशी प्रतिनिधी मंडळ मध्ये बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी)

कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलजा हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका)

झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बोबे)आहेत.

हे विदेशी प्रतिनिधी मंडळ उद्या दि. 6 मे रोजी सकाळी 9 वा अलिबाग येथे मतदान प्रक्रियेची पाहणी करणार आहेत. पोलिंग पार्टी चे आगमन व प्रस्थान, साहित्य वाटप याची जी एस एम कॉलेज येथे पाहणी करणार आहेत. त्यानंतर दु. 3 वा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत बैठक होणार आहे.

दि. 7 मे रोजी विविध मतदान केंद्राना भेटी देऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची माहिती घेणार आहेत.

 

संबंधित पोस्ट

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण29 बोलेरो व 15 मोटारसायकल पोलीस दलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा गावांसाठी तीन टँकर मंजूर..

डिफेन्स पेन्शन धारकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

रेड लाईट भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स महिलांनी तोडले…

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द..

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन