vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द..

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द…

 

 

 

रायगड( प्रतिनिधी:-राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळ तर्फे रायगड जिल्ह्यातील डायलेसिस रुग्णांना औषधोपचार उपलब्ध व्हावा यासाठी रु.20 लाख रुपयांचे अर्थसहाय्य निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर) च्या माध्यमातून देण्यात आले आहे. आरसीएफचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांनी आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्मक डॉ.अंबादास देवमाने यांना सदर रकमेचा धनादेश सुपूर्द केला.

 

यावेळी आरसीएफचे प्रभारी कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांसह संजीव हरळीकर, महाव्यवस्थापक (मासं व प्र, ईटीपी), महेश पाटील प्रभारी मुख्य व्यवस्थापक (प्रशासन) व संतोष वझे (जनसंपर्क अधिकारी) उपस्थित होते.

 

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिमाह सुमारे 600 डायलेसिस सेशन्स होत असतात ज्यात जिल्ह्यातील गरजू रुग्णांवर डायलेसिस उपचार केले जातात. या रुग्णांकरिता कंझ्युमेबल्स, सोल्युशन्स व औषधे खरेदीसाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबाबतचे विनंती पत्र जिल्हा शल्य चिकित्सकांद्वारा आरसीएफला दिले होते. या महत्वपूर्ण औषधांची रुग्णांसाठीची आवश्यकता लक्षात घेऊन आरसीएफ व्यवस्थापनाने संचालक मंडळाच्या बैठकीत सुमारे 20 लाख रुपयांचे अर्थसहाय्य सीएसआर अंतर्गत तात्काळ मंजूर करून घेतले. समाजातील गरजूंना लाभदायी ठरतील अशा विविधांगी योजनांसह अलिबाग परिसरातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळेल अशा योजना कर्तव्यनिष्ठेने आणि प्राधान्यक्रमाने राबविण्यावर आरसीएफचा नेहमीच भर राहिला आहे. तसेच सीएसआरच्या माध्यमातून एकंदरीत समाज उन्नयनासाठी व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत 

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवासाठी रेल्वे स्थानकांवर तिकीट व सुविधा,चाकरमान्यांच्या प्रवासासाठी रेल्वे सज्ज. 380 गणपती विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था.

जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणातर्फे तालुकास्तरावर शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात-गडचिरोलीची जवाहरलाल नेहरु नगरपरिषद शाळा राज्यात तृतीय

vishwatmaklokswamivarta