
ठाणे सह दुय्यम निबंधक, वर्ग 2 नूतन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न
ठाणे, प्रतिनिधी :- राज्य शासनाने 50 शासकीय कार्यालयांचे नूतनीकरण एकाच टप्प्यात पूर्ण केले असून आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आभासी पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) या कार्यालयांचे लोकार्पण संपन्न झाले. ठाणे शहरातील सह दुय्यम निबंधक, वर्ग 2 या कार्यालयाचा नूतनीकरण सोहळा आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी ठाणे जिल्हा सहनिबंधक श्री.नारायण राजपूत, सह दुय्यम निबंधक (वर्ग 2) श्री.एस.पी. भोपे व कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000



