vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण29 बोलेरो व 15 मोटारसायकल पोलीस दलाकडे सुपूर्द

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण29 बोलेरो व 15 मोटारसायकल पोलीस दलाकडे सुपूर्द

 

 

 

जालना, राज्य प्रतिनिधी :- जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या 29 बोलेरो आणि 15 मोटारसायकल वाहनांचे पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत जालना पोलीस दलासाठी राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

 

जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वाहनांच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे उपस्थित होते.

 

जालना पोलीस दलाला यापूर्वी जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्यावतीने 14 बोलेरो आणि 20 मोटारसायकल देण्यात आल्या होत्या. एकूण 78 वाहने चालू वर्षात जालना पोलीस दलाला देण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस दलाला वाहन मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.

 

***

संबंधित पोस्ट

महाड : तळई गावात दरड कोसळून 35 जणांचा दुर्देवी मृत्यू.

ई-पिक पाहणी करुन घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा- मंत्री डॉ. अशोक वुईके

लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवार अंतिम*4 उमेदवारांचे अर्ज मागे

४ तासांच्या कठीण शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून १० किलोचा गोळा काढला – स्त्रीरोगतज्ञ डॉ.राजश्री दयानंद कटके

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटेमध्ये पिकांचे व्यवस्थापन; कृषि विभागामार्फत उपाययोजना जाहिर…