vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन

 

 

 

जालना, प्रतिनिधी:- टंचाईशी निगडीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02482-223132 आणि 1077 असा आहे.

 

जालना जिल्हयात सन 2023-24 व 2024-25 अंतर्गत दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे जिल्हयातील जनतेकडून टंचाईशी निगडीत जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी विषय प्रकरणी दूरध्वनीव्दारे किंवा प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या तक्रारी / निवेदने यांचे निरसन टंचाई नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळविले आहे.

 

***

संबंधित पोस्ट

प्रशासन गाव की ओर’ सुशासन सप्ताह जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न-प्रलंबित कामांचा निपटारा वेळेत करा-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष; प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर ‘गणेशोत्सवा’चा भव्य चित्ररथ

vishwatmaklokswamivarta

उत्तर भारतात मुसळधार पावसाचे थैमान, 100 हून अधिक जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर होणार

vishwatmaklokswamivarta

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी**उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे* 

vishwatmaklokswamivarta