vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रियेची रंगित तालीम

जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रियेची रंगित तालीम

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- लोकसभा २०२४ साठी जिल्ह्यात चवथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी दि.१८ पासून कार्यक्रम सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वात प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक काम अचूक आणि विहित वेळेत व्हावे यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. दि.१८ पासून नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन दाखल प्रक्रियेची रंगित तालीम घेण्यात आली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणापासून ते अर्ज घेणे, ते सुविधा कक्षात अर्ज भरणे, आवश्यक कागद पत्रांची जोडणी करणे. त्यानंतर अनामत रक्कम भरणा करणे, अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे, शपथ घेणे इ. सर्व टप्पे करण्याट आले. त्यासाठी लागणारे सर्व संगणकीकृत नमुने, त्याच्या प्रति. कागद पत्रे, मतदार यादी, त्यातील क्रमांक शोधणे असे सर्व टप्पे बारकाईने करुन नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची तयारी तपासण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, प्रभोदय मुळे, व्यंकट राठोड तसेच संबंधित कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

vishwatmaklokswamivarta

ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta

निवडणूक निरीक्षक दाखलःप्रशासनाचा घेतला आढावा; नागरिकांनाही भेटणार

vishwatmaklokswamivarta

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,