vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, प्रतिनिधी : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांना एकत्रित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहकार भवनची उभारणी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बांधकामाधीन तसेच प्रस्तावित सहकार भवनाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. याबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात विविध जिल्ह्यात बांधकामाधीन व प्रस्तावित सहकार भवनसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार व सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, सहकार भवनच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता व प्रशासकीय मंजुरीच्या प्रस्तावांबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी. सहकार भवनच्या माध्यमातून जिल्हास्तरावर सहकारी संस्थांना एकाच छताखाली कार्यालयीन सुविधा आणि समन्वयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नियोजित आराखड्यानुसार आणि निश्चित वेळापत्रकानुसार कामे पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.

बैठकीत संबंधित विभागीय अधिकारी व जिल्हास्तरीय यंत्रणांनी सहकार भवनांच्या बांधकाम प्रगतीचे सादरीकरण केले. सहकार भवनांसाठी निधी उपलब्धता, तांत्रिक मंजूरी आणि कामांची सद्यस्थिती याबाबत सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जिल्हा नियंत्रण कक्षास भेट-आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबवा- उपमुख्यमंत्रीआपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा- उपमुख्यमंत्री

एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक.! बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक

vishwatmaklokswamivarta

बारवाले महाविद्यालयात ‘Flagship Programme’ कार्यशाळा उत्साहात पार पडली

vishwatmaklokswamivarta

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उद्‌घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरात वाहतुकीचे नियोजन*

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू, जिंतूर येथे नैसर्गिक आपत्तीचा घेतला आढावा नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करण्याचे निर्देश; रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत करावा, आपत्ती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींना शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी