vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

लोकसभा निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

लोकसभा निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

बुलडाणा, प्रतिनिधी  :

लोकसभा निवडणूक 2024ची घोषणा झाली असून दि. 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) लागू करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, तसेच मतदारसंघाचे मतदार नसतील अशा व्यक्तींनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक असल्याने दि. 26 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच लोकसभा निवडणूक निर्भय व नि:पक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मतदारसंघाचे मतदार नसतील, अशा व्यक्तींनी मतदानाचा दिनांक आणि मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे दि. 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेनंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये. तसेच मतदानाचा निश्चित केलेल्या दिनाकाच्या 48 तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश करण्यात आले आहे.

 

सदर बंदी आदेश संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याकरीता मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळून दि. 24 एप्रिल 2024 रोजीचे सकाळी 6 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल 2024 च्या रात्री 22.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 135 व भारतीय दंड संहिता, 1860चे कलम 188 नुसार कार्यवाहीस पात्र राहणार आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

परिवहन भवनचे आज 2 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती..

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम* *वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे* — *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

भारताला एका नवीन व्हिजनची आवश्यकता आहे. भारताला व्हिजन काँग्रेस पक्षचं देऊ शकतो. लहान-लहान राजकीय पक्ष ते देऊ शकत नाहीत, असे खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी  म्हणाले

vishwatmaklokswamivarta

आज नारी शक्तीचा सन्मान, देशातील महिलांचं सक्षमीकरण करणं आजच्या यात्रेचं उद्देश भारत जोडो यात्रा राहुल गांधी

आजपासून महाकुंभची सुरुवात! पौष पौर्णिमेला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सुरुवात, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर भाविकांचा अथांग सागर…

vishwatmaklokswamivarta

रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड…