vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अपक्ष उमेदवाराची लोकसभा निवडणुकीत उडी

सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अपक्ष उमेदवाराची लोकसभा निवडणुकीत उडी …

 

मुंबई- प्रतिनिधी

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तिकर हे निवडणूक रिंगणात असून,त्यांच्या विरोधात..सर्वसामन्य जनतेचे प्रश्न आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी वकिली व्यवसाय करणारे ॲड.सुनील चव्हाण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत.अशी माहिती त्यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात दिली.

दिंडोशी,गोरेगाव, जोगेश्वरी, वर्सवा, अंधेरी (पूर्व) व अंधेरी ( पश्चिम)या सहा विधानसभा मतदार संघाचा समूह असलेल्या उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ऍड.सुनील चव्हाण खासदारकीसाठी निवडणूकीच्या रिगणात आहे.

महागाई, बेरोजगारीने सर्वसामान्य कुटुंब त्रस्त आहे,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, कर्जामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत नाही, गोरगरीब कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, रुग्णालयात सोवी-सुविधा उपलब्ध नाहीत, पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे. प्राथमिक सुविधा पुरविल्या जात नाहीत, या प्रस्थांवर आपल्या सरकारने गेल्या ७० वर्षात कोणतेही प्रभावी धोरण बनवले नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता आजही प्रगतीचा मुख्यप्रवाह पासून वंचित आहे.असा आरोप

ॲड चव्हाण यांनी करीत नागरिकांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळावा म्हणून मी निवडणूक लढवित आहे,असे ते म्हणाले.

संबंधित पोस्ट

मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक  यांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता 4 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी 9 वाजता सुरू होण्याची वेळ न पाळणाऱ्या शाळांना कारवाईचा इशारा..

vishwatmaklokswamivarta

गिरगाव चौपाटी गेट वे ऑफ इंडिया, आणि नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी 21 जुलैपर्यंत मुदत..

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं63व्या वर्षी निधन…

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ