
आज राम नवमी निमित्त मुंबईतील हरे कृष्ण इस्कॉन मंदिरात शोभायात्रा तर अयोद्धेमध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित प्रभू श्रीराम यांच्या दर्शनास लाखोच्या संख्येने उपस्थित
राज्य प्रतिनिधी
देशभर आज राम नवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अयोद्धेमध्ये राम मंदिर उभं राहिल्यानंतर यंदाची ही पहिलीच राम नवमी असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. राम नवमी निमित्त आज देशभर विविध मंदिरांमध्ये आजचा दिवस मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जात आहे.
देशभर आज राम नवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अयोद्धेमध्ये राम मंदिर उभं राहिल्यानंतर यंदाची ही पहिलीच राम नवमी असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. राम नवमी निमित्त आज देशभर विविध मंदिरांमध्ये आजचा दिवस मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जात आहे. आज राम नवमी निमित्त मुंबईतील जुहूच्या इस्कॉन मंदिरात शोभायात्रा निघाली होती तर अयोद्धेमध्ये भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. जम्मू कश्मीरच्या माता वैष्णवदेवीच्या मंदिरामध्येही राम नवमीचा सोहळा साजरा होत आहे.
मुंबईत सर्वत्र रामनवमीचे निमित्ताने अनेक ठिकाणी शोभ यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे सायंकाळी शुभ यात्रा निघणार आहे यावेळी मोठ्या संख्येने राम भक्त जय श्री राम चा नारा देऊन यात्रेचा शुभारंभ करणार आहेत मुंबईसह पूर्ण देशभरात जगभरात राम नामाचा गजर सर्वत्र सुरू आहे आज रामनवमीनिमित्त देश विदेशातील देवळांमध्ये महाआरत्या आणि महाभोगाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी अनेकांना महाप्रसादाचा लाभ ही मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे



