vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा –  उपमुख्यमंत्री अजित पवार,एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश..

मुंबई, प्रतिनिधी : एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मोहिमेच्या धर्तीवर राज्यस्तरावर अभियान राबविण्याबाबत बैठक झाली.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही.राधा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक देणे, मालमत्तेचे हक्क देणे, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे. केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत करावी. पात्र एकल महिला लाभार्थींना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून राज्यस्तरीय संगणकीय डेटाबेस प्रणाली तयार करणे, अंगणवाडी सेविका निवड प्रक्रियेप्रमाणे शासन निर्णयात बदल करून एएनएम, स्टाफ नर्स निवड आणि एनएचएम भरती प्रक्रियेत एकल महिलांना प्राधान्य देणे, त्यांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, एकल महिलांसाठी गाव पातळीवर जागरूकता शिबिरे आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करणे,अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

 

०००

संबंधित पोस्ट

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विभागाच्या कामाचा आढावा

लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन*राज्यातील पहिल्या पतसंस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार नवी दिल्लीतील जागतिक परिषदेमध्ये ऊर्जा प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात- 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती- आत्मसमर्पण केलेल्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही उपस्थिती- सी-60 जवानांचा सत्कार, अत्याधुनिक एके-103 आणि पिस्तुले दिली- बुलेटप्रुफ वाहनांसह 19 वाहने पोलिसांच्या सेवेत- कोरमा नाल्यावरील आंतरराज्यीय पुलाची ड्रोनने पाहणी…