vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 /18-जालना लोकसभा मतदार संघाकरीता आतापर्यंत 19 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल,आज 24 नामनिर्देशन पत्रांची विक्री

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 /18-जालना लोकसभा मतदार संघाकरीता आतापर्यंत 19 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल,आज 24 नामनिर्देशन पत्रांची विक्री

 

 

राज्य प्रतिनिधी :- 18-जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदारसंघातून आज एकूण 14 जणांनी 24 नामनिर्देशन पत्र खरेदी केले. आज दि. 24 एप्रिल अखेर उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी एकूण 102 जणांनी 234 फॉर्म घेतले. आज 10 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत एकूण 19 उमेदवारांनी 28 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

 

आज रावसाहेब दादाराव दानवे (भारतीय जनता पार्टी), कल्याण वैजिनाथराव काळे (इंडियन नॅशनल काँग्रेस), मनोज नेमिनाथ कोलते (अपक्ष), चाबुकस्वार राहूल निरंजन (अपक्ष), सुपडू आत्माराम पाटील (अपक्ष), विकास छगन लहाने (अपक्ष), बनेखाँ नूरखाँ पठाण (आझाद स्वाभिमानी सेना), बाबासाहेब संतुकराव शेळके (समता पार्टी), शिवाजी उत्तम भारस्कर (अपक्ष), प्रभाकर देवगण बकले (वंचित बहुजन आघाडी) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार, दि. 25 एप्रिल, 2024 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, जालना यांनी कळविली आहे.

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम;शाळास्तरावर दि.१५ पासून जनजागृतीसाठी विविध उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

vishwatmaklokswamivarta

तेलंगणा राज्य येथील सिकंदराबाद कॅट येथे भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू; CM श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, ‘ती माझी नातलग होती’

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, हिंदुजा रुग्णालयात दाखल… सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती

जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती