vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्ह्यात 25 व 26 एप्रिल रोजी यलो अलर्ट  विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता    25 व 26 एप्रिल दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस   नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

जालना जिल्ह्यात 25 व 26 एप्रिल रोजी यलो अलर्ट  विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता    25 व 26 एप्रिल दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस   नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

 

 

 

जालना, प्रतिनिधी :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 25 व 26 एप्रिल 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस तसेच ताशी 30 ते 40 कि.मी. प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधीत यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

सदर वातावरणाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल , सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपन, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. याप्रमाणे सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

शिवदिक्षा व गुरू मंत्र संस्कार व सत्संग सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे विश्र्वरूप हॉल येथे संपन्न…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्व वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

32-रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

जिल्ह्यात होमगार्ड सदस्य नोंदणी सुरु

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta