vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!,शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!,शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

 

ठाणे, प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे.यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थितांना केले.

 

मतदान जनजगृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये पार पडला.

 

शाळकरी मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे व प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आई-बाबास पत्र हा उपक्रम राबविला. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी पालकांना भावनिक साद घालत असा संदेश लिहिला की, आम्ही मत देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या! मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. तसेच विद्यार्थीवर्गाने विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर केला.

 

‘मतदान करा… मतदान करा… लोकशाहीचा विजय करा या संकल्पनेमधून मी मतदान करणारच आपण ही करा’ असा प्रेरक संदेश फलकावर लिहून शिक्षक व कर्मचारीवर्गांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.

 

0000

संबंधित पोस्ट

मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल च्या टेरेसवर मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजात गाणी वाजत असल्या ने पोलिसांनीही घेतली दखल

vishwatmaklokswamivarta

एसएसबी परीक्षा पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण-इच्छुक उमेदवारांची 28 नोव्हेंबरला मुलाखत

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेचा अभिजात प्रवास: ‘दर्पण’ ते 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन*

vishwatmaklokswamivarta

ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव -**‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’*

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानसार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी अर्थसहाय्य; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर…  

vishwatmaklokswamivarta