vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024/ 18-जालना लोकसभा मतदारसंघ क्युआर कोडद्वारे कर्मचाऱ्यांना मिळणार मतदान प्रक्रिया व ईव्हीएम मशिन विषयी माहिती      — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024/ 18-जालना लोकसभा मतदारसंघ क्युआर कोडद्वारे कर्मचाऱ्यांना मिळणार मतदान प्रक्रिया व ईव्हीएम मशिन विषयी माहिती      — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 

 

 

            जालना,  जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या सहा विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 61 मतदान केंद्रावर दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांवर नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया व ईव्हीएम मशिन्सच्या माहितीसाठी क्युआर कोड तयार करण्यात आला आहे, याचा वापर करुन कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रीयेबाबत माहिती जाणून घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जालना निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

 

जालना लोकसभा मतदारसंघाकरीता 2 हजार 61 मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक दोन व तीन यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मतदान प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती व ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशिन्सच्या मांडणीसह संपूर्ण कार्यवाही याविषयीची संपूर्ण माहिती असलेला क्युआर कोड जिल्हा प्रशासनाने तयार केला आहेत. सर्व विभाग प्रमुखांमार्फत त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांना पाठवून याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. https://jalna.gov.in/en/training-material-for-presciding-officer/ या लिंकवर जाऊन जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सदरील माहिती डाऊनलोड करुन घ्यावी किंवा या बातमीतील क्युआर कोड स्कॅन करुन सदरील प्रशिक्षणाविषयी माहिती उपलब्ध करुन घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

 

***

संबंधित पोस्ट

औरंगाबादमधून बेपत्ता झालेली युट्यूबर ‘बिंदास काव्या’ अखेर सापडली, पालकांनी मानले पोलिसांचे आभारकाव्या बेपत्ता झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे असलेल्या इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार

नगरपरिषद व नगरपचांयत क्षेत्रात2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या फसवणूकीने गिरणी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात, ५ मार्चला भव्य संताप मोर्चा

फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण स्तुत्य – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार