vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज पुन्हा मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

आज पुन्हा मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत काल झालेल्या वादळी पावसानंतर आजही हवामान विभागाने मंगळवार, 14 मे रोजी संध्याकाळी मेघगर्जनेसह हलका पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याशिवाय मुंबईत दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण पहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 14 मे रोजी, “मुंबईत विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस, 40-50 किमी ताशीवेगाने वारे वाहतील. त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण गोवा या भागातही पावसाच्या सरी कोसळतील”.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबई हवामान (Mumbai weather) मंगळवारी, 14 मे रोजी संध्याकाळी मेघगर्जनेसह हलका पाऊस (Light Rain)कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याशिवाय मुंबईत दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण पहायला मिळणार आहे. काल सोमवारी झालेले धुळीचे वादळ आणि पावसामुळे ठाणे, मुंबईसह आणि आजूबाजूच्या परिसरात तापमानात चांगलीच घट झाली आहे. उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली. सखल भागात पाणी साचले होते. पावसाचा वाहतूकीवरही परिणाम झाला होता. बहुतांश सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलां/मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना मदत  जाहीर होणार…

vishwatmaklokswamivarta

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

महत्त्वाची सूचना* मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी .

दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राखी बांधली

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ५४ व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना…

vishwatmaklokswamivarta