
अतिसार नियंत्रण पंधरवाड्याची पाडळीत सुरवात..
बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रम दि. ६ ते २१ जून राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळी येथे आज करण्यात आला.
यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव यांनी ५ वर्षापर्यंतच्या बालकांना अतिसार, जुलाब आजारापासून सुरक्षित करण्यायासाठी ओआरएस पावडर आणि अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना झिंक गोळ्यांचे वाटप आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी वाटप करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ओआरएस पावडर तसेच झिंक गोळ्यांच्या साठ्याची उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रसिद्धी विस्तार व माध्यम अधिकारी यांनी आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य शिक्षण प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन कले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील जबरे, डॉ. नितीन कदम, अर्चना ईंगळे, आर. के. जाधव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल आदी उपस्थित होते.
00000



