vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या

प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

 

 

 

              मुंबई प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मुंबई शहर व उपनगर साठी विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाच्या सामाजिक,आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत,असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम बारा पोटजातीमधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी पात्रता, निकष व अटी पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी मातंग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा. त्याचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.

 

मातंग समाजातील व तत्सम बारा पोट जातीतील त्या विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शैक्षणिक दाखला/टी-सी, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट साईज फोटो दोन, उत्पन्नाचा दाखला (रु.३ लाख रूपयांच्या आत) इत्यादीसह अर्ज करावा.

 

प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या संस्थेसाठी :- सदर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची नोंदणी कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. या प्रशिक्षणासाठी अदा करावयाची प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा करण्यात येईल. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकांची राहील. त्या शिवाय या संस्थेची प्रशिक्षण फी अदा केली जाणार नाही. या पात्र संस्थाचालकांनी नियम व अटीशर्तीनुसार प्रस्ताव https://www.slasdc.org या प्रणालीवर सादर करण्यात यावा. ही प्रशिक्षण संस्था मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.

 

३० जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय,मुंबई शहर उपनगर रूम नंबर ३३, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू.) मुंबई ४०००५१ येथे स्वीकारले जाणार आहेत. प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामूल्य मिळेल.

 

*****

संबंधित पोस्ट

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस येथे ८ व्या गेटवे लिटफेस्ट चा कार्यक्रम २८ फेब्रु व १ मार्च २०२५ रोजी होणार…

vishwatmaklokswamivarta

धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे    – *विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी**अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये, सूक्ष्म नियोजनाचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta

घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 15 हजार दंड वसूली व 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीत अडीच हजार प्रकरणे निकाली…

vishwatmaklokswamivarta