vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत..

 

 

मुंबई प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

 

विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली

.या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

संबंधित पोस्ट

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, राजावाडी रुग्णालयात पीडितेचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशातील पुन्हा एकदा हिंदू व्यावसायिकावर गोळ्या झाडून हत्या

मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढ…

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा विभागात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्दिष्ट पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लोकसभा निवडणूक-2024: काय करावे, काय करू नये