vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेशस्थानिक बातम्या

क्रीडा विभागाच्यावतीने ठाण्यात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन..

क्रीडा विभागाच्यावतीने ठाण्यात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन..

 

 

        ठाणे,) :- शारीरिक आणि अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व विचारात घेऊन प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्त येत्या 21 जून 2024 रोजी ठाण्यातील कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी 7.00 वाजता योग दिनाचे कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. प्रतिवर्षी 21 जून हा दिवस ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदाही क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोपरी येथे दि. 21 जून 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता तालुका क्रीडा संकुल बारा बंगला जवळ कोपरी ठाणे (पूर्व) येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

0000000000

संबंधित पोस्ट

पद्मविभूषणउद्योगपती#रतनटाटा यांचे काल रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी.मान्यवरांनी श्री. टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण..

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभाग शासकीय वसतिगृह व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशितांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

हजारो भीमसैनिकांच्या संख्येने उपस्थितीत धम्म मेळावा उत्साहात संपन्न – आयोजक राजेंद्र कांबळे यांनी मानले सर्वांचे आभार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सामान्यांसाठी समर्पित’ ही भावना दाखवली,ध्वजारोहणानंतर ताफ्याला थांबवून जखमी दुचाकीस्वाराला मदत केली

vishwatmaklokswamivarta

संकुलावर आंतरराष्‍़ट्रीय योग दिन उत्साहात साजर निरोगी शरीर व मनासाठी सर्वांनी नियमित योगा करावा- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित योग शिबीरास जालनेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मंत्रालयात दिवाळी फराळ व सजावट साहित्याच्या स्टॉलचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta