vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक न्याय विभाग शासकीय वसतिगृह व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशितांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

सामाजिक न्याय विभाग शासकीय वसतिगृह व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशितांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

जालना,  (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहातील व्यावसायिक अभ्यासक्रम अथवा अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी चालु शैक्षणिक वर्षात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यासाठी https://hmas.mahait.org हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. 20 सप्टेंबर 2024 पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनंत कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे चालविली जातात. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती तसेच त्यांचे राहणीमान, समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे तसेच, त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाचे जालना, भोकरदन, अंबड व मंठा येथे मुलींचे व जालना, बदनापुर, अंबड, भोकरदन, घनसावंगी येथे मुलांचे असे एकुण 10 शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत कार्यान्वीत असून या वसतिगृहामध्ये मुलींची 355 व मुलांची 500 असे एकुण 855 मान्य विद्यार्थी संख्या आहे. शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता आठवीच्या वर्गापासुन प्रवेश देण्यात येतो. शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सोयी-सुविधा पुरविल्या जातात.

 

शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग यांच्याकरिता प्रवर्गनिहाय जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. सदर शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेवर गुणवत्तेनुसार, प्रवर्गनिहाय व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो. दि. 20 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करुन त्या अर्जाची प्रत संबंधित शासकीय वसतिगृहात जमा करणे आवश्यक आहे. अर्जाची प्रत प्राप्त झाल्याशिवाय अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 73 उमेदवार रिंगणात*आज 38 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागे*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत शाळांमधून ‘स्वीप’ उपक्रमांव्दारे विद्यार्थ्यांच्या पालक, नातेवाईकांना मतदानाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ च्या अनुषंगाने, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील संभाव्य चुका याबाबत माहिती घेणे आणि पडताळणीसाठी  मतदारांशी संपर्क… डोअर टू डोअर

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला निर्देश

नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन…

vishwatmaklokswamivarta

न्यायालयीन अभिलेख्यांच्या संगणकीकरणाचा सांगली जिल्ह्याला मान- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा- अभिलेख्यांचे संगणकीकरण पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ- पेपरलेस कोर्टची संकल्पना होणार साकार- वेळ, पैसे, जागेची होणार बचत

vishwatmaklokswamivarta