vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला निर्देश

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी  बोगदा प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला निर्देश..

मुंबई प्रतिनिधी: नवी मुंबई विमानतळ हे मुंबईशी बोगद्याने जोडता येईल का? त्याची व्यवहार्यता तपासून विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एनएमआरडीएस दिले आहेत.आज एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळ हे मुंबईतले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे. या विमानतळाची प्रवासी क्षमता वर्षाला दोन कोटी असेल. साहजिकच या विमानतळासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर वाहने ये जा करतील. सध्या जे मार्ग आहेत ते अपुरे पडण्याची शक्यता आहे कारण वरचेवर नवी मुंबई विमानतळावर विमानांची वाहतूक वाढणार आहे. या विमानतळाची राष्ट्रीय महामार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक नेटवर्कशी अखंड जोडणी करणे गरजेचे ठरणार असून यादृष्टीने सध्याचा सी लिंक , बीकेसी ते नवी मुंबई विमानतळ असा बोगदा करता येतो का याची चाचपणी करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी महानगर आयुक्तांना सांगितले आहे. त्यासाठी या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे, एकूणच भू व सागरीय वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त कसा ठरेल ते अभ्यासण्यासाठी तसेच एकूणच आरेखनासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.

 

०००

 

संबंधित पोस्ट

बंजारा समाजाच्या प्रश्नांची जाण अडचणींना दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न : लोकसभा अध्यक्ष ओम बिरला

जय शिवाजी, जय भवानी”च्या जयघोषाने दुमदुमले गडचिरोली!*जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न”शिवरायांचे विचार अंगीकारून व्यक्तिमत्त्व घडवा” – जिल्हाधिकारी एकता पार्क चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हाहाकार! 🌧️ हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत ….

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -:अभिजात मराठी भाषा..जतन आणि संवर्धन

vishwatmaklokswamivarta

मुंबई कुर्ला येथे*जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान**