vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानपरिषदेला ज्येष्ठ विचारवंत सदस्यांची परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप

विधानपरिषदेला ज्येष्ठ विचारवंत सदस्यांची परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप..

 

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्र विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत वि.स. पागे, जयंतराव टिळक, रा.सू. गवई अशा अनेक ज्येष्ठ सदस्यांच्या विचारांची परंपरा लाभलेली असून या सभागृहाच्या माध्यमातून संसदीय आयुधांचा वापर करून सदस्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र विधान परिषदेतील सर्वश्री सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया हे पाच सदस्य २१ जून २०२४ रोजी निवृत्त झाले. या निवृत्त झालेल्या सदस्यांना आज विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास व औकाफ पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधान परिषदेतील सदस्य उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वरिष्ठ सभागृहाच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांनी सभागृहाचा लौकिक वाढवला, पावित्र्य जपले. विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्यांनी आपापल्या भागाचे प्रतिनिधित्व करून त्या भागातील समस्यांना न्याय मिळवून दिला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी निवृत्त झालेल्या सदस्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादीचे  माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

vishwatmaklokswamivarta

पतप्रंधान मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 13 जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंग चार्टमध्ये प्रथम

vishwatmaklokswamivarta

लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक- बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबईतील खार येथील पब मधील महिला व्यवस्थापकाचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांना अटक..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील घटना ,राजगडावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला, पळापळीत महिला दरीत कोसळली

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. पांचाळ यांचे आवाहन-आचारसंहिता व खर्च तक्रारीसाठी सीव्हिजील ॲप,टोल फ्री क्रमांक 1950 यावर संपर्क साधावा

vishwatmaklokswamivarta