vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अपघातातील जखमी वारकऱ्यांवर शासन उपचार मोफत करणार  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अपघातातील जखमी वारकऱ्यांवर शासन उपचार मोफत करणार  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नवी मुंबई, प्रतिनिधी- डोंबिवली येथील घेसरगाव येथून पंढरपूरकडे खासगी बसने निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. या दूर्घटनेत दूदैवाने मृतपावलेल्या वारकऱ्यांच्या कुटूंबीयांना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जखमींची विचारपूस केली तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांकडून जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डोंबिवली येथील घेसरगांव परिसरातील वारकरी भक्त MH-02-FG-9966 या क्रमांकाच्या खासगी बसने पंढरपूरच्या दिशेने जात असतांना 15 जुलै 2024 रोजी मध्येरात्रीच्यावेळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोली पासून काही अंतरावर या खासगी बस आणि बसपुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाल्याने बस मधील एकूण 54 वारकऱ्यांपैकी 03 वारकरी व ट्रॅक्टरमधील 02 व्यक्ती अशा एकूण 05 व्यक्तींचा दुदैवी मृत्यू झाला असून, 46 जखमी वारकऱ्यांवर कळंबोली येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी 7 वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अपघातातील जखमींच्या वैद्यकीय उपचारावरील सर्व खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुंख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

*************

संबंधित पोस्ट

महाआवास अभियानात जिंती ग्रामपंचायत (ता. पाटण) राज्यात अव्वल!**महाआवास अभियान 2021-22 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव**पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांकडून ग्रामस्थांचे अभिनंदन व सत्कार*

vishwatmaklokswamivarta

विभागाने द्वारपोच चिकित्सा सेवा द्यावी-मंत्री पंकजा मुंडे *गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप

सुपा MIDC मध्ये उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही ! औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण व सुरक्षितता जपण्यास शासन कटिबद्ध ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पेन्शन धारकांना न्याय दिला जाईल – विश्वास उटगी 

vishwatmaklokswamivarta

मुंबईत संतोष बांगर यांचं शक्तीप्रदर्शन; एकनाथ शिंदेही झाले सहभागी; म्हणाले “तूच जिल्हाप्रमुख आणि आपणच शिवसैनिक…”उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन; एकनाथ शिंदेही झाले सहभागी

श्रीहरी कोठा येथून अवकाशात झेपावलं आदित्य एल-1; पहिले तीन टप्पे यशस्वीपणे पूर्ण…

vishwatmaklokswamivarta