
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज,विद्यापीठाच्या परिक्षा रद्द…
राज्य प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात काल पासून धुवाधार मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही देखील संपुर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असणार असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आलेली आहे
राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस पडत आहे तर अनेक ठिकाणी जल भराव ही होत आहे अनेक ठिकाणी तर पाण्याची पातळी वाढली जात आहे धरणामध्ये पाणी वाढ होत आहे तर अनेकांना जोरदार मुसळधार पावसाचा फटकाही पडत आहे. जिल्ह्यातले ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर- गगनबावडा सह एकूण ३३ मार्ग बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाचे रौद्ररुप पाहून आज शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणात ८० टक्के पाणी भरले तर वारणा ७२ टक्के पाणी भरले आहे. हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहुवाडीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे



