vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग

मुंबई, प्रतिनिधी : नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अ‍ॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षकांसाठीच्या १३ व्या प्रशिक्षण सत्राला प्रारंभ झाला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेश (१११), मध्य प्रदेश (१२८), नागालँड (६७), मेघालय (६६) आणि चंदीगड (७) येथील एकूण ३७९ अधिकारी या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत नवी दिल्लीत ५,००० पेक्षा अधिक BLO व BLO पर्यवेक्षक यांना निवडणूक आयोगामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उद्घाटन भाषणात सांगितले की, मतदार यादी तयार करणे आणि निवडणुका पारदर्शकपणे व कायद्याच्या चौकटीत पार पाडणे, याबाबत प्रशिक्षण देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा १९५०, १९५१, मतदार नोंदणी नियम १९६०, निवडणूक आचारसंहिता नियम १९६१, तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीनंतर त्यावर होणाऱ्या अपील प्रक्रियेबाबतही ज्ञानेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी (कलम २४(अ)) तसेच मुख्य निवडणूक अधिकारी (कलम २४(ब)) यांच्याकडे अपील करता येते, याची माहिती प्रशिक्षणार्थींनी मतदारांपर्यंत पोहोचवावी.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान पार पडलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) नंतर मेघालय, नागालँड, मध्य प्रदेश, चंदीगड आणि उत्तर प्रदेश येथून कोणतेही अपील प्राप्त झाले नाहीत.

या प्रशिक्षणादरम्यान सहभागी अधिकाऱ्यांना मतदार नोंदणी, विविध फॉर्म्सची हाताळणी, क्षेत्रीय तपासणी याबाबतीत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाद्वारे अधिकाऱ्यांचे IT साधनांचा वापर व व्यवहारज्ञान वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच, EVM आणि VVPAT यंत्रणांबाबत तांत्रिक प्रात्यक्षिके व मॉक पोल्स आयोजित करण्यात आले आहेत.

000

संबंधित पोस्ट

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल 

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

vishwatmaklokswamivarta

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

25 सप्टेंबर रोजी रोप-वे हिरकणीवाडी येथे रंगीत तालीमीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख  -8 मार्च – जागतिक महिला दिन;समाज तभी होगा महान जब नारी का होगा सन्मान…!

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे