vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– जिल्ह्यातील 65 वर्षावरील पात्र ॲटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी महाराष्ट्र शासनाने धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. पात्र चालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ॲटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालक यांनी http://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी. परवानाधारक चालक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे परवानाधारकांकडे 5 वर्षे जुना परवाना असावा व त्यांच्याकडे ॲटोरिक्षा व मीटर टॅक्सी वगळता त्यांच्याकडे कोणतेही चारचाकी वान नसावे. असे पात्र परवानाधारक चालक आवयक कागदपत्रे स्कॅन करुन दिलेल्या संकेतस्थळावर दिलेले शुल्क जमा करुन पावती स्वत: कडे ठेवण्यात यावी.

परवानाधारक चालक यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO OFFICE) येथे संपर्क करु शकतात.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सर्व पात्र चालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला होणारØ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 ऑक्टोबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नमुंमपामार्फत विशेष कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पपूर्वीसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गती द्यावी   – जिल्हाधिकारी अशोक काकडे

डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता समर्पित – उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उपमुख्यमंत्र्यांकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन

vishwatmaklokswamivarta

जनसामान्यप्रेमी आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील जनता दरबारास ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद…