vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता समर्पित – उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उपमुख्यमंत्र्यांकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन

डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता समर्पित – उपमुख्यमंत्री अजित पवार-ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उपमुख्यमंत्र्यांकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन..

पुणे, प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, चेतन तुपे, पोलीस उपायुक्त कृषिकेष रावले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, डॉ. बाबा आढाव यांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित आदी वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले. रिक्षा पंचायत, हमाल पंचायत, माथाडी, असंघटित कामगारांच्या प्रसंगात त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागली. ते विचार घेऊन ते शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य जगले.छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून त्यादृष्टीने वाटचाल केली, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी यांनी डॉ. बाबा आढाव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पत्नी शीलाताई आढाव, मुलगा असीम आढाव, अंबर आढाव आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन**कल्याण येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम*

अमृत दुर्गोत्सव – पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती..

vishwatmaklokswamivarta

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्याअर्जावर कार्यवाही करण्याच्या कालावधीत वाढ…

vishwatmaklokswamivarta

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

मुंबईत धारावी रामरवाडी तील घटना-  एका बेकायदेशीर बांधकामाचे भिंत कोसळून:2 कामगार  गंभीर जखमी सायन रुग्णालयात दाखल, महानगर पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

vishwatmaklokswamivarta