vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन**कल्याण येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम*

 

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन**कल्याण येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम*

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भीम गीतांची संगीतमय मानवंदना अर्पण करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सादरीकरणापुरता मर्यादित नसून, समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा आढावा संगीत व सादरीकरणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सोमवारी, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात कलाकार संदेश उमप व सहकलाकार तसेच श्रावणी महाजन व सहकलाकार सहभागी होणार असून, त्यांच्या सादरीकरणातून भीम गीतांची सुरेल मैफल रंगणार आहे.

हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकार होत असून, सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे

सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरण बैठक

vishwatmaklokswamivarta

भूमि अभिलेख विभागातील पदभरतीसाठी १३ व १४ रोजी परीक्षा

vishwatmaklokswamivarta

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार

अण्णासाहेब पाटील महामंडळ व बँकेच्या योजनांचे शहापूर तालुक्यात मार्गदर्शन शिबिर संपन्न

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta