vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन..

राज्य प्रतिनिधी-पुणे,: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केली.

यावेळी अधिकारी कक्ष, आवक जावक बारनिशी, सी.सी.टीव्हि, वायरलेस, डे-बुक, मुद्देमाल कारकून कक्ष,तपास पथक कक्ष, हिरकणी कक्ष, पुरुष व महिला विश्रांती कक्ष, खेळाचे मैदान, बैठक कक्ष, प्रसाधन गृह, आदी कक्षांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नवीन विकासकामांची माहिती देण्यात आली.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते

संबंधित पोस्ट

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून-डीप क्लिनींगव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर…

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्य शासनाचा सकारात्मक प्रयत्न – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन

रविवारी राखी मेल सुविधा उपलब्ध राहणार