vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील- मुख्य सचिव सुजाता सौनिक व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचे उद्घाटन

सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील- मुख्य सचिव सुजाता सौनिक व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचे उद्घाटन

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी: सध्या समाजात डिजीटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारांच्या माहिती अभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘व्हॉट नाऊ’ ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करीत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसेच ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या 9019115115 या हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘व्हॉट नाऊ’च्या फाऊंडर निती गोयल, निवेदिता श्रेयांस आदी यावेळी उपस्थित होते.

 

महापे येथे सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी

 

सायबर गुन्हे व ऑनलाईन छळवणूकीच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या की, महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध व उलगड्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. महापे येथे सायबर सुरक्षेबाबत केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. व्हॉट नाऊ संस्थेने हेल्पलाईन क्रमांक जारी करून सर्वांना सायबर सुरक्षा देण्याविषयी पाऊल उचलले आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे. ऑनलाईन व्यवहार व वर्तनाबाबत फसवणूक झाल्यास न घाबरता पुढे येवून या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

शाळा, महाविद्यालय, कार्यालये, रहिवासी संकु

[25/07, 8:13 pm] Swamiji: संकुले यामध्ये सायबर सुरक्षेसाठी युवकांनी जनजागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र सायबर सेलच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या ‘व्हॉट नाऊ’ चळवळीच्या माध्यमातून सायबर सुरक्षा अधिक मजबूत होण्यास हातभार लागेल, असा विश्वासही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्‍या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्‍यांचे निलंबन !सनातनचे धार्मिक विधीविषयीचे ॲप बंद करण्यामागेही ‘गाझा’फेम साम्यवादी मानसिकता; दोषींवर गुगलने कारवाई हवी ! – सनातनची मागणी 

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा इच्छुकांनी सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये दि.31 जुलै 2025 पर्यंत अर्ज प्रत्यक्ष सादर करावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024-संवाद यात्रेत प्रशासन प्रमुखांनी साधला मतदारांशी संवाद मतदान करण्याचे केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

धारावीतील कामराज नगर मधील रहिवाशांचे आमरण उपोषण सुरू…

स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न* *ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta