vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना : गरीब कुटुंबांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी 

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना : गरीब कुटुंबांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

 

जालना, प्रतिनिधी – राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राज्य शासनाने जाहिर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सुचनेनुसार मंगळवारी (दि.6) अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच योजनेपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधीतांनी घेण्याची सूचना श्रीमती मेत्रेवार यांनी केली.

 

बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. डी.एस. दिवटे, ऑईल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी व तहसील कार्यालयांचे कर्मचारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडरचे पुनर्भरण तेल कंपन्यांमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

लाभार्थ्यांची पात्रता- या योजनेतंर्गत जिल्ह्यातील उज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (रिफिल) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. सदर लाभ केवळ 14.2 कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय

 

राहील.

 

कार्यपध्दती -सदर योजनेची सबसीडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) द्वारे जमा करण्यात येणार असल्यामुळे ई-केवायसी करणे आवश्यक आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चौधर यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

शिवतिर्था बाहेर मध्यरात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांचा बर्थडे साजरा केला

vishwatmaklokswamivarta

ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट,महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्याप्रकरणी  जितेंद्र आव्हाड यांच्याविरूध्द कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध..

राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: नारायण राणे पुन्हा मैदानात, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta