vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण

लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण

 

बुलडाणा, प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत 3 लाख 87 हजार 81 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील 3 लाख 86 हजार 698 अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जांची छाननी करण्यात जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आहे.

 

ऑनलाईन प्राप्त अर्जामध्ये मेहकर तालुक्यात 42 हजार 959 अर्जापैकी 42 हजार 956, बुलडाणा तालुक्यात 38 हजार 802 अर्जापैकी 38 हजार 799, लोणार तालुक्यात 25 हजार 661 अर्जापैकी 25 हजार 657, खामगाव तालुक्यात 47 हजार 620 अर्जापैकी 47 हजार 607, संग्रामपूर तालुक्यात 23 हजार 206 अर्जापैकी 23 हजार 198, चिखली तालुक्यात 42 हजार 630 अर्जापैकी 42 हजार 613, नांदुरा तालुक्यात 25 हजार 225 अर्जापैकी 25 हजार 211, शेगाव तालुक्यात 21 हजार 412 अर्जापैकी 21 हजार 400, देऊळगाव राजा तालुक्यात 18 हजार 275अर्जापैकी 18 हजार 256, जळगाव जामोद तालुक्यात 24 हजार 49 अर्जापैकी 23 हजार 994, सिंदखेड राजा तालुक्यात 29 हजार 54 अर्जापैकी 28 हजार 971, मोताळा तालुक्यात 24 हजार 189 अर्जापैकी 24 हजार 113, मलकापूर तालुक्यात 23 हजार 999 अर्जापैकी 23 हजार 923 अर्जांची छाननी तालुकास्तरावर पूर्ण करण्यात आली आहे.

 

जिल्ह्यात 3 लाख 87 हजार 81 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. तालुकास्तरावर 3 लाख 69 हजार 507 अर्ज स्विकृत करण्यात आले. यातील 3 लाख 86 हजार 698 अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आशा, अंगणवाडी सेविका यांच्याकडे दाखल करण्यात आलेले ऑफलाईन अर्ज ऑनलाईनरित्या दाखल करण्यात येत आहे. ऑनलाईन दाखल सर्व अर्जांची तालुकास्तरावर छाननी करण्यात येते आहे.

 

तालुकास्तरावर स्विकृत करण्यात आलेले सर्व अर्ज जिल्हास्तरावर येणार आहे. यात अर्जाची जिल्हास्तरावरील समितीतर्फे पडताळणी होणार असून त्यानंतर योजनेचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचविण्यासह देशाची एकता, अखंडता मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री

भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना..

केंद्रीय क्षयरोग प्रतिबंध लसीकरण मोहिमेच्या डॉ.तृप्ती शिंदे यांनी ‍ शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिली भेट

vishwatmaklokswamivarta

मुंबई, ठाणे, पालघर मध्ये पुढील 3-4 तास मुसळधार कोसळण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज