vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निर्लेखित साहित्याच्या विक्रीसाठी इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात.

निर्लेखित साहित्याच्या विक्रीसाठी इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात.

 

 

 

रायगड(जिमाका) प्रतिनिधी:- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहीत्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले हत्यारे, उपकरणे व लाकडी फर्निचर इत्यादी साहित्याचा समावेश असून इच्छुक जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड एन.एस.पुरकर यांनी केले आहे.

 

या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदी दारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधित विभागामध्ये दि. 16 ऑगस्ट ते दि.30 ऑगस्ट 2024 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायं.5.00 वाजेपर्यंत पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल.

 

या नमुन्यातीलं पूर्ण माहिती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5 हजार अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल सदर रक्कमेचा भरणा प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड जि.रायगड या नावाने डी.डी. च्या स्वरुपात करावा. इच्छुक जी.एस.टी. नोंदणी धारक खरेदीदारांनी वर उल्लेख केलेल्या विहीत नमुत्यातील निविदा अर्ज डी. डी. सह (प्रपत्र अ व प्रपत्र व करीता वेगळे स्वतंत्र लिफाफा द्यावा) दि.30 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सिलबंद लिफाप्यात कार्यालयात जमा करावा.

 

संपूर्ण निविदा प्रक्रीया रद्द करण्याचा किवा त्यामध्ये फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड जि.रायगड यांनी राखून ठेवला आहे. सदर सिलबंद निविदा दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2.30 वा. संस्थेच्या प्राचार्याच्या कक्षात उघडण्यांत येतील.

 

०००००००

संबंधित पोस्ट

यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानुसार कारवाई करणार- मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

देशातील 75 बँकांच्या डिजिटल बँकींग कार्यप्रणालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण  सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी विभागात 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सविधान जनजागृती रॅली.

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाले महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत 1,04,703 गणवेश होणार तयार

जिल्हा न्यायालय आवारात मध्यस्थी जनजागृती शिबिर

vishwatmaklokswamivarta

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नमुंमपामार्फत विशेष कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta