vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार..! विधानसभा निवडणुकीत लढत पाहायला मिळणार

 बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार..! विधानसभा निवडणुकीत लढत पाहायला मिळणार

 

[ राज्य प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ लक्षवेधी ठरला होता. पवार विरुद्ध पवार राजकारणाने राज्यसह देशभराचं लक्ष बारामतीतल्या लढतीकडे लागलं होतं. सुप्रीया सुळे आणि उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आमने सामने होत्या. दोन्ही पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढाईत शरद पवार गटाने बाजी मारली. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार आणि नातू रोहित पवार तसंच पार्थ पवार सक्रिय राजकारणात आहेत. आता पवार घराण्यातील आणखी एक वारसदार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे.

 

बारामती विधानसभेत अजितदादांचे पूत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पूत्र जय पवार यांना विधानसभेचं तिकिट मिळण्याची शक्यता आहे. बारामती विधानसभेबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. जय पवारांच्या (उमेदवारीबाबत अजित पवारांनी संकेत दिलेत. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारांना संधी देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. बारामती विधानसभा मी सात-आठ वेळा लढलोय मला इंटरेस्ट नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. तर याआधी बारामती मतदारसंघात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांनी (लढण्याचे संकेत दिलेयत. त्यामुळे बारामतीत जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होण्याची शक्यता आहे.

जय पवार हे बारामतीतल्या समाजकारणात सक्रीय आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जय पवार पक्ष कार्यात सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांची धुरा जय पवारांनी सांभाळली होती.

संबंधित पोस्ट

32 रायगड लोकसभा मतदारसंघ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी पाच नामनिर्देशन पत्र दाखल

धुळे जिल्ह्यात भाजपने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले चंद्रकांत पाटील यांची कन्या विजयी

उद्धव ठाकरे सरकारचं षडयंत्र हाणून पाडणार; OBC आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा भाजपा ओबीसी बैठकीत घणाघात.

राज्यसभेच्या निवडणुकीत: संजय राऊत म्हणाले- आमच्या 4 उमेदवारांचा विजय निश्चित

भोकरदन विधानसभा मतदार संघातील प्रस्थापितांना आजी-माजी आमदारांना यानिवडणुकीत त्यांची जागा दाखवा- अ‍ॅड. भास्कर मगरे- हजारो भुमिहिन,कास्तकरांची गर्दी…

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल चर्चेला उधान