vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

..70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची  घोषणा,राष्ट्रीय चित्रपटांवर मराठीची छाप…

 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची  घोषणा,राष्ट्रीय चित्रपटांवर मराठीची छाप…

 

बॉलीवूड प्रतिनिधी

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपली छाप सोडली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला.

 

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला. सचिन सुर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वारसा’ या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘आणखी एक मोहेनजोदारो’ या सिनेमाला बेस्ट बायोग्राफिकल हिस्टोरिकल कम्पायलेशन फिल्म कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला आहे

राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांमध्ये तीन मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. ‘वाळवी’बरोबरच आणखी दोन मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला आहे. ‘वारसा’ या माहितीपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर

– सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी

– राष्ट्रीय चित्रपटांवर मराठीची छाप

– साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला दोन पुरस्कार

– साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार

– ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार

– सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या ‘वारसा’लाही राष्ट्रीय पुरस्कार

– वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार

कार्तिकेय’ 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पोनियिन सेल्वन 1’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘KGF Chapter 2’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘केजीएफ चॅप्टर 2’ ला सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कारही मिळाला. मनोज बाजपेयी यांना ‘गुलमोहर’साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला.

 

 

संबंधित पोस्ट

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ: मतदार नोंदणीसाठी ‘फॉर्म 19’सादर करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंत

vishwatmaklokswamivarta

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा कॅनडावर तीव्र हल्ला; म्हणाले- ‘खलिस्तानी मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया या व्होटबँकेच्या राजकारणाने चालतात…..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

सेवा संकल्प अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

मी तुम्हाला लिहून देतो की, गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही. त्यामुळं ते तोडफोड करुन सरकार बनवू शकतात.”

vishwatmaklokswamivarta