vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाळेचा एक दिवस रस्ता सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षेचा संदेश गावपाड्यापर्यंत..

शाळेचा एक दिवस रस्ता सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षेचा संदेश गावपाड्यापर्यंत..

 

 

ठाणे, प्रतिनिधी:- मुरबाड मधील डोंगराळ भागात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम दि.23 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाला.

 

त्यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा, चिंचवाडी येथे आणि इतर 7 जिल्हा परिषद शाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचा संदेश असलेल्या 150 स्कूल बॅगचे वाटप कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले.

 

या कार्यक्रमास ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली, मोटर वाहन निरीक्षक प्रशांत देवने, सहायक मोटर वाहन निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, बांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे श्री.बांडे आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री.देवने यांनी विद्यार्थ्यांना वाहतूकीची पंचसूत्री जसे हेल्मेटचा वापर करावा, सीट बेल्ट वापरावा, मोबाईल वापरून वाहन चालवू नये, वेगावर नियंत्रण ठेवावे, मद्यपान करून वाहन चालवू नये आदी बाबींचे महत्व पटवून दिले तसेच रस्ता सुरक्षा नियमांची माहिती दिली. भविष्यात वाहन चालविताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना याप्रसंगी शपथही देण्यात आली.

 

00000000000

संबंधित पोस्ट

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या निवडीची विधानसभेत घोषणा विधिमंडळ विशेष अधिवेशन २०२४-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह १७३ विधानसभा सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी प्रकाश महाजन

vishwatmaklokswamivarta

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत- मंत्री उदय सामंत

जालना शहर महानगरपालिका, जालना. बातमीपत्र.” घर घर संविधान “

vishwatmaklokswamivarta