vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

        जालना,  (जिमाका) :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.

 

संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 13 सप्टेंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

3500 हून अधिक श्रीसदस्य व नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्ग व रेल्वे स्टेशन सखोल स्वच्छता मोहीम यशस्वी

vishwatmaklokswamivarta

मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरुवात; कोविड टास्क फोर्स सदस्यांची माहितीकोरोना विषाणुच्या (Covid19) दुसऱ्या लाटेत मोठं नुकसान सहन केल्यानंतर आज पुन्हा संपुर्ण देश तिसऱ्या लाटेच्या (Third Wave) उंबरठ्यावर उभा असल्याचं दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या वाढायला सुरूवात झाली असून, त्यामध्ये काही अंशी ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीअंटने बाधित रुग्णांचा देखील समावेश आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना रुग्णवाढीबद्दल चिंता व्यक्त केली असून, निर्बंध वाढवावे लागू शकतात असंही म्हटलं आहे. त्यातच आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच काल दिवसभरात मुंबईत २५१० रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील काल सकाळीच मुंबईतील रुग्णवाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती. मुंबईत यावर्षी २० जानेवारी दरम्यान ३०० केसेस होत्या आता त्या १३०० ते २२०० पर्यंत पोहोचतील. त्यामुळे ७ पटीने हा दर वाढला आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल दिली होती. त्यातच राज्याच्या कोविड -१९ टास्क फोर्सचे सदस्य (Covid19 Task Force) डॉ. शशांक जोशी (Dr. Shasank Joshi) यांनी इंडीया टुडेशी बोलताना मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरूवात झाल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा: ओमिक्रॉन व कोरोनाच्या व्हॅरिएंटना नामोहरम करणाऱ्या प्रतिपिंडांचा शोध राज्यातील ही परिस्थिती पाहता सावधगिरी बाळगावी लागणार आहे. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. कारण आतापर्यंत जे रुग्ण आढळून आले असले तरी, या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली असल्याने याचा रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांवर फारसा ताण पडत नाही. जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून 80% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉन असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट सुरू झाली आहे अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

दुर्गम भागातील रस्त्यांबाबत तातडीने उपाययोजना-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणीसाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन

देशातील सर्वात मोठे व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा मुलगा  अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये विवाहबंधनात अडकणार..

शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत– आमदार संजय खोडके संपूर्णत: अभियानाचा सन्मान सोहळा