vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळाव्यांचे आयोजन

जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळाव्यांचे आयोजन

 

रायगड (जिमाका)द- रायगड जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्ह्यात विविध मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील आस्थापनाची एकूण मनुष्य बळाच्या १०% व सेवा क्षेत्रातील आस्थापनाची एकूण मनुष्य बळाच्या २०% अशी रिक्तपदे अधिसूचित करण्यात येतील. त्याकरिता या मेळाव्यात विविध खाजगी आस्थापनाचा सहभाग असणार आहे.

 

मेळाव्याचे विविध स्थळ व दिनांक पुढीलप्रमाणे

२३ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा. रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पेण यांच्या मार्फत, विभागीय कार्यालय रामवाडी, पेण,

२३ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पेण यांच्या मार्फत शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, रामवाडी पेण.२४ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल.२५ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत. २६ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग, व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अलिबाग आणि जे एस एम कॉलेज, अलिबाग यांच्या मार्फत जे. एस. एम. कॉलेज, अलिबाग.२६ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड.

२७ सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण. ३० सप्टेंबर वेळ १० ते १५ वा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे.

या मेळाव्यामध्ये उमेदवाराची निवड केलेल्या आस्थापनामध्ये ६ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कौशल्य विकास विभागामार्फत DBT द्वारे शैक्षणिक पात्रता (बारावी उतीर्ण ६,०००/- रु, आय टी आय/पदविका उतीर्ण ८,०००/- रु, पदवी उत्तीर्ण १०,०००/- रु) या प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल.

 

या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. तरी या मेळाव्याचा जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन  सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग श्रीम.अ.मु. पवार यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

ईडी आणि सीबीआयचा वापर करून विरोधी पक्षांना त्रास दिला जात आहे, पवन खेडा यांच्या अटकेवर संजय राऊत यांची टीका

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी राज्य सरकारने चांगली बातमी दिली आहे. 2022- 23 वर्षासाठी मुंबईतील मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी आवश्यक मागणी ‘सक्षम ॲप’वर नोंदवावी-मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा इच्छूक उमेदवार,आस्थापना,उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 /18-जालना लोकसभा मतदारसं,निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टीन यांनी केली विविध कक्षांची पाहणी,नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात