vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दूग्ध व्यवसाय विकास:दूध उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान

दूग्ध व्यवसाय विकास:दूध उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान

 

राज्य प्रतिनिधी

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

या दूध उत्पादकांना प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये देण्यात येईल. दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या प्रति करिता १ ऑक्टोबर २०२४ पासून २८ रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे. त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रतिलिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ३५ रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे.

 

ही योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून राबवण्यात येईल. मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी ९६५ कोटी २४ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

कंगनाचा वाद बिहार-झारखंडच्या कोर्टातही पोहोचला, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे अपघाती मृत्यू प्रकरणाची SIT चौकशी,प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार-

vishwatmaklokswamivarta

विभागीय कला व क्रीडा महोत्सव 2025 थाटात संपन्न

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर :मुंबईत गणेशोत्सवात दहा दिवस विशेष बसेसची सोय

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर*