vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

सेवेमध्ये निष्काम भावना गरजेची – सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज..

सेवेमध्ये निष्काम भावना गरजेची – सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज..

 

आध्यात्मिक वार्ता

: हरिजन सेवक संघाच्या 92व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित सद्भावना संमेलनामध्ये आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, मानव खर्‍या अर्थाने तेव्हाच मानव बनतो जेव्हा तो समस्त भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वांभूती परमात्म्याचे रूप पाहू लागतो आणि निष्काम भावनेने सर्वांची सेवा करतो.

या प्रसंगी हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर कुमार सान्याल व उप-प्रधान श्री.नरेश यादव यांनी सतगुरु माताजी व निरंकारी राजपिता रमितजी यांचा वस्त्र-प्रावरण व सूती दुपट्टयाद्वारे स्वागत-सत्कार केला. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक वारसा रूपी संस्थेच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून चरख्याचे लघु स्मृति चिन्ह देखील या सेवक संघाच्या वतीने सद्गुरु माताजींना समर्पित करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये हरिजन सेवक संघाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व सरस्वती वंदनाचे गायन केले तर निरंकारी इंस्टिट्यूट ऑफ म्यूजिक न्ड आर्ट (नीमा) च्या मुलांनी गांधीजींचे आवडते भजन, वैष्णव जन सह अन्य भक्तिगीतांचे सुमधुर गायनही केले. सेवक संघाचे अध्यक्ष श्री.सान्याल यांनी गांधीजी आणि कस्तूरबाजी यांच्या मार्गदर्शनाचे वर्णन करताना एका बाजुला संघाच्या उपक्रमांचा उल्लेख केला तर दुसर्‍या बाजुला संत निरंकारी मिशनच्या विचारधारेचे अनुपालन केल्याने वसुधैव कुटुम्बकम साकारण्याची शक्यता वर्तवून सद्गुरु माताजींना धन्यवाद दिले. त्यांनी निरंकारी मिशनकडून सामाजिक उत्थान घडवून आणण्यासाठी केल्या जाणार्‍या अवरित प्रयासांची मन:पूर्वक प्रशंसा केली.

यावेळी निरंकारी राजपिताजी यांनीही आपल्या आशीर्वचनातून सांगितले, की सतगुरुकडून परमात्म्याची प्राप्ती केल्यानंतर मनुष्य सर्वांचे दु:ख-वेदना स्वत:चे समजून अहंकाररहित सेवा करु लागतो.

कार्यक्रमाच्या शेवटी संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनचे सचिव, श्री.जोगिंदर सुखिजा यांनी आभार प्रकट करताना हरिजन सेवक संघाच्या भारतभरातून सहभागी झालेलया सदस्यांना व विशिष्ट अतिथिंना धन्यवाद दिले तसेच त्यांना येत्या नोव्हेंबरमध्ये करण्यात येत असलेल्या 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे हार्दिक आमंत्रणही

संबंधित पोस्ट

१५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना  • जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिशिबीर

vishwatmaklokswamivarta

राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या काही दिवसांत आणखी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, असा इशारा आयएमडीने दिला

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी…

vishwatmaklokswamivarta

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदे’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरी राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये, माती परीक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध लोकशाहीच्या राज्यात आंदोलकांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल, तर पोलिसांना शरम वाटली पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल