vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बदनापूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेखा तौर इच्छुक आनंद व उत्साहाचे वातावरण

बदनापूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेखा तौर या इच्छुक आनंद व उत्साहाचे वातावरण

 

जालना : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून बदनापूर मतदार संघातून सौ. रेखा तौर ह्या इच्छूक असुन त्यांनी आपली दावेदारी घोषीत केल्यानंतर कामगारांमध्ये आंनदाचे व उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बदनापूर विधानसभेसाठी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रेखा तौर इच्छुक असून पक्षाने उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू आणि बहुमानाने निवडून असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रेखा तौर यांनी असंघटित कामगार संघटनेच्या उपप्रदेशाध्यक्षा म्हणून काही वर्षापासून पक्ष संघटना वाढविण्यास भर दिला आहे. पक्षाच्या निर्देशानुसार त्यांनी विविध विषयांवर यशस्वी आंदोलनं केली. कामगारांचे प्रश्न सोडविले आहेत, त्यामुळेच त्यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघावर आपला दावा केला आहे. गेल्या काही दिवसापासून बदनापूर हा विधानसभा मतदार संघ शरदचंद्र पवार गटाकडे असून या मतदार संघावर त्यांचे प्राबल्य देखील आहे. या मतदार संघातून आपण दावेदार असल्याचे जाहीर करताच अनेक कामगारांनी आनंद व्यक्त केला असून त्यांना उमेदवारी दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. अलिकडेच त्यांनी बदलापूर येथील घटनेप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. हे आंदोलन सुध्दा न भूतो न भविष्यती असेच झाले होते. याची आठवणही कामगार महिलांनी करुन दिली.

चौकय……..

… तर रेखा तौर याच योग्य उमेदवार!

या मतदार संघावर पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा दावा असून बदनापूर विधानसभेत आज कोण आणि कोणत्या पक्षाचा आमदार आहे, हे महत्वाचे नाही. तर निष्ठावान आणि कर्तबगार महिला म्हणून रेखा तौर याच योग्य उमेदवार असल्याचे मत अनेक महिला कामगारांनी व्यक्त केले आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास निश्चितच त्या विजयी होतील, असा विश्वास देखील या महिलांनी व्यक्त केला आहे

संबंधित पोस्ट

स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषीत

निवडणूक कालावधीत आचार संहितेचे काटेकोर पालन करावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

हर घर तिरंगा’ उपक्रमात शहरातून निघाली तिरंगा प्रभात फेरी*विद्यार्थ्यांना दिली तिरंगा शपथ, स्वाक्षरी मोहिम

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

vishwatmaklokswamivarta

सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्या या मागणीसाठी शहरजिल्हा काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेला जोरदार सुरुवात…प्रत्येक वार्डात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल- शेख महेमूद

vishwatmaklokswamivarta

एआय’ तंत्रज्ञानाशी करा मैत्री;जिल्हाधिकारीकार्यालयातील प्रशिक्षणात एआय चे धडे