
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात शहरातून निघाली तिरंगा प्रभात फेरी*विद्यार्थ्यांना दिली तिरंगा शपथ, स्वाक्षरी मोहिम
बुलडाणा, प्रतिनिधी: स्वातंत्र्य दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमात आज जिल्हा प्रशासनातर्फे तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. यात शहरातील सात शाळांतील दोन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. जिजामाता प्रेक्षागार येथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तिरंगा प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, गटविकास अधिकारी सरीता पवार, तहसिलदार विठ्ठल कुमरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हा क्रिडा अधिकारी बी. एस. महानकर आदी उपस्थित होते.
सुरवातीला उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना तिरंगा शपथ देण्यात आली. तसेच हर घर तिरंगा मोहिमेत स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली. यावर जिल्हाधिकारी डॉ. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी स्वाक्षऱ्या करून मोहिमेला सुरूवात केली.
त्यानंतर तिरंगा रॅली जिजामाता प्रेक्षागार, संगम चौक, जयस्तंभ चौक, तहसिल चौक मार्गे निघून जिजामाता प्रेक्षागार येथेच समारोप करण्यात आला. या रॅलीत भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, सहकार विद्या मंदिर, सेंट जोसेफ स्कूल, एडेड हायस्कूल, शिवाजी विद्यालय, उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रॅलीसाठी जिल्हा प्रशासनासोबतच नगर पालिका, क्रिडा विभाग, शिक्षण विभाग यांनी सहकार्य



